MHTCET 2021 Exam | या तारखेला पुन्हा सीईटीची परीक्षा होणार, उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा
राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सीईटी (MHTCET 2021 Exam) परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
मुंबई : राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सीईटी (MHTCET 2021 Exam) परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. उदय सामंत यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सीईटीच्या परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे. अशी घोषणा उदय सामंतांनी दिली होती. त्यानुसार आता उदय सामंत यांनी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. नव्या वेळेनुसार परीक्षा आता 9 आणि 10 ऑक्टोबरला पार पडणार आहे. (mhtcet 2021 exam will be held again 9 and 10 october for those students who missed it due to the heavy rain says Minister uday samant)
एकूण 27 ते 30 हजार विद्यार्थ्यांना सीईटीची परीक्षा देता आली नव्हती. राज्यातील अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला हजर राहता आले नव्हते. "परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नसून संबंधित विद्यार्थ्यांनी काळजी करू नये", असं म्हणत सामंतांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला.
महाराष्ट्रात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसाचा फटका विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला बसला. नद्यांना पूर आला. मराठवाड्यात अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांचे दरवाजे उघडण्यात आले. परिणामी गावांचा संपर्क तुटला. अशी बिकट परिस्थिती उद्भवल्यामुळे विद्यार्थ्यांना सीईटीच्या परीक्षेला उपस्थित राहता आले नाही.