प्रशांत अंकुशराव / मुंबई : microplastics in the digestive tracts of fish : आता मासे खव्वयांना सावध करणारी बातमी. तुम्ही आम्ही अतिशय चवीने मासे खातो. मात्र हेच मासे आपल्या आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात. या माशांमुळे तुम्हाला कॅन्सरही होऊ शकतो. (Risk of cancer) काय आहे त्यामागचे कारण, ते जाणून घ्या. (Microplastic fragments and microbeads in digestive tracts of planktivorous fish from urban coastal waters)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मासे खायला कुणाला आवडत नाही? सुरमई, पापलेट, कोळंबी, बोंबिल अशी नावे जरी घेतली तरी तोंडाला पाणी सुटते. मासे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. मात्र हेच मासे तुमच्या जिवावर उठू शकतात. मासे खाल्ल्याने तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. 


कारण मुंबईकरांच्या आवडीच्या माशांमध्ये प्लास्टिकचे मायक्रो अंश सापडले आहेत. (Microplastics in fish) केंद्रीय शैक्षणिक मत्स्य संस्था अर्थात CIFEच्या संशोधनात ही बाब उघड झालीय. एल्सव्हायर नावाच्या नावाजलेल्या जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. 


तुम्ही खाताय प्लास्टिकयुक्त मासे ? 


या संशोधनानुसार मुंबईतले सांडपाणी थेट समुद्रात सोडले जाते. त्यात बरंच प्लास्टिक असते. याशिवाय किनाऱ्यावरही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असते. यातले बरचसे प्लास्टिक समुद्रतळाशी जाते. त्यामुळे समुद्रतळाशी राहणाऱ्या माशांमध्ये प्लास्टिकचे अंश आढळून आले आहेत. विशेष करून मुंबईकरांच्या आवडीचा बोंबिल, घोळ आणि जिताडा माशातही प्लास्टिकचे सुक्ष्म कण सापडले आहेत. या सर्व माशांच्या कल्ल्यात काळ्या-निळ्या रंगाचे प्लास्टिकचे अंश सापडल्याचे संशोधनात म्हटले आहे. 



प्लास्टिकयुक्त माशांमुळे कॅन्सरचा धोका?


प्लास्टिकचे विघटन होत नाही. त्यामुळे माशांच्या माध्यमातून हे प्लास्टिक माणासाच्या शरीरात गेल्यास कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो. याशिवाय पोट दुखणे, अतिसार अशा समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे मासे खाताना सावध राहा, हे चवदार मासे गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकतात.