अमूलचं दूध महागलं, पाहा अर्ध्या लीटरसाठी किती रुपये मोजावे लागणार
आता सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वाढत्या महागाईमध्ये गृहिणींना आता आणखी फटका बसणार आहे.
मुंबई : आता सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वाढत्या महागाईमध्ये गृहिणींना आता आणखी फटका बसणार आहे. याचं कारण म्हणजे अमूलने दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 मार्चपासून अमूलच्या दुधाचे दर वाढणार आहेत.
राज्यातील दूध उत्पादकांनी शेतकऱ्यांकडून दुधाच्या खरेदी दरामध्ये प्रतिलिटर 3 रुपये वाढ करण्यात आली आहे. अमूलने दुधाचे दर वाढवल्याने आता बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.
अमूल दुधाच्या विक्री दरातदेखील 3 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूध वाढ 1 मार्चापासून अमलात येणारं आहे. दूध भुकटी आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने दुधाच्या किमती वाढल्या आहेत.