मुंबई : डिसेंबर जानेवारी महिने म्हटलं की खाद्य महोत्सवांची रेलचेल, आणि खवय्यांची चंगळ. मुंबईतल्या खवय्यांसाठी जोगेश्वरीत अस्सल मराठमोळ्या मिसळींचा महोत्सव सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वांच्यांच तोडांला पाणी सुटेल असा अस्सल मराठमोळा पदार्थ म्हणजे  मिसळ. नाव काढताच तोंडाला पाणी सुटेल आणि भूक चाळवेल अशा मिसळीच्या शोधात प्रत्येकजण असतो. हेच जाणून मुंबईतल्या जोगेश्वरीत मिसळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय.


इथे एकाच छताखाली दहा प्रकारच्या मिसळ मुंबईकरांना चाखायला मिळतायत. तुम्हालाही या मिसळीची चव चाखायची असेल तर जावं लागेल शामनगर तलाव या ठिकाणी.


कोल्हापुर, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि नाशिक या ठिकाणच्या मिसळींची चव तुम्हाला इथे चाखायला मिळेल. तेव्हा जिभेचे चोचले पुरवायचे असतील तर मग या मिसळ महोत्सवाला भेट द्याच.