महिलांच्या स्वसंरक्षणासाठी मिशन साहसी या उपक्रमाची सुरूवात
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं महिलांच्या स्वसंरक्षणासाठी मुंबईत मिशन साहसी या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली.
मुंबई : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं महिलांच्या स्वसंरक्षणासाठी मुंबईत मिशन साहसी या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली.
साहसी उपक्रमाचा शुभारंभ
या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील मुलींमध्ये धाडस निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला जाणार आहे. एस्सेल ग्रूपचे शिल्पकार आणि राज्यसभा खासदार श्री.सुभाष चंद्रा यांच्या हस्ते मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये मिशन साहसी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
अशा उपक्रमाची देशाला गरज - सुभाष चंद्रा
यावेळी मिशन साहसी या उपक्रमाची वेबसाईटही सुरू करण्यात आली. या उपक्रमाद्वारे साडेपाच लाख मुलींना प्रशिक्षण देण्याचं ध्येय ठेवण्यात आलंय. ग्रँडमास्टर शिफूजी शौर्य भारद्वाज हे कॉलेजमधील विद्यार्थिनींना प्रशिक्षण देणार आहेत. महिला कमजोर नसून त्या शक्तीवान आहेत आणि अशा उपक्रमाची देशाला गरज असल्याचं मत खासदार सुभाष चंद्रा यांनी व्यक्त केले.