मुंबई :  "खोके सरकारमुळे 5 प्रकल्प राज्याबाहेर गेले. कृषी क्षेत्रात ओला दुष्काळ जाहीर करायला हवा होता, तो अद्याप झालेला नाही. शेतकऱ्यांना मदत जाहीर झालेली नाही. कुठेही पंचनामे झालेले नाहीत. शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचलेली नाही. मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्सफर आणि टाईमपास सुरु आहे. खोके सरकारचा मुंबईकरांच्या पैशांवर डोळा आहे" अशा शब्दात  माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thakceray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Maharashtra Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे मुंबईत (Mumbai) पत्रकार परिषदेत बोलेत होते. यादरम्यान त्यांनी विविध मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर घणाघात केला. (mla and former minister aditya thackeray criticized to cm eknath shinde on his 5 thousand crores for mumbai roads announcement)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"राज्यात कृषी आणि उद्योग हे 2 महत्त्वाचे क्षेत्र आहेत. हे दोन्ही क्षेत्र कोलमडत चालले आहेत. मात्र यानंतरही खोके सरकार राजकारणावर लक्ष केंद्रीत करतंय. सत्य समोर आणणाऱ्या पत्रकारांना एचएमव्ही म्हटलं जातंय. रोजगारासाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांना शेंबडी पोरं म्हणून हिणवलं जातंय. सत्य बोलणाऱ्यांचा आवाज दडपला जातोय, हुकुमशाही होतेय. राज्यात, देशात हुकुमशाही येतेय का", असा सवालही ठाकरे यांनी राज्य सरकारवर आसूड ओढताना केला.  


"उद्धव ठाकरे गेले अडीच वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा इतर शहरांप्रमाणे मुंबईवर लक्ष होतं. राज्यात सरकार बदलल्यानंतर मी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही या गोष्टीला रोख लागलेला. मुंबई महापालिकेत दडपशाही, हुकुमशाही चाललीय. अधिकारी दबावाखाली काम करतायेत. टेंडर, ट्रान्सफर आणि टाईमपास या 3 गोष्टी मुंबई महापालिकेत सुरु आहेत", असंही ठाकरे यांनी नमूद केलं.   


"मुंबईच्या रस्त्यांसाठी 5 हजार कोटी रुपये दिले जातील. यामुळे रातोरात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होतील, या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेवरुन ठाकरे यांनी हल्लाबोल केला. गेल्या 10 ते 15 दिवसांमध्ये हे 5 हजार कोटी रुपयांचे टेंडर रद्द केले गेले. आता रस्त्यांचं काय होणार, याबाबत कुणालाच माहिती नाही", असंही ठाकरे यांनी सांगितलं.