मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख अटकेनंतर भाजपा आमदार नितेश राणे यांचे सूचक आणि उपरोधिक ट्विट केलं आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. 


नितेश राणेंच ट्विट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल देशमुख - शुभ दिवाळी 


अनिल परब - ख्रिसमस 


विशेष धन्यवाद  नवाब मलिक आणि संजय राऊत यांचे 



माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर रात्री उशिरा कारवाई करण्यात आली. अखेर त्यांना अटक करण्यात आली. धनत्रयोदशीची सुरूवात या मोठ्या बातमीने झाली आहे. अनिल देशमुख यांच्यावर ईडीचं सावट होतं. अखेर दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ईडीने मोठी कारवाई केली आहे. 


100 कोटींहून अधिक गैर-पारदर्शक व्यवहार केल्याप्रकरणी ईडीकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाली आहे. रात्री उशिरा अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. बारा तासाहून अधिक काळ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरूच होती. 



माजी गृहमंत्री अनिल देशमुख सोमवारी ईडी कार्यालयात दाखल झाले. जवळपास पावणे बारा वाजल्यापासून त्यांची चौकशी सुरू होती. चौकशीनंतर ईडीने देशमुखांना अटक केली आहे. ही चौकशी बराच काळ लांबली आणि रात्री उशिरा ईडीने कारवाई केली आहे.