मुंबई : भाजपाचे आमदार राम कदम यांनी मंत्रालयासमोर ठिय्या मांडला. राम कदम यांनी ठिय्या मांडल्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राम कदम यांनी रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याशी ज्या पोलिसांनी गैरवर्तन केले आहे, त्यांना निलंबित करा अशी मागणी केली आहे.  राम कदम यांनी काळी फित बांधून महाराष्ट्र सरकारचा निषेध केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्णब गोस्वामी यांना अटक ही  लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेची ही गळचेपी असल्याची टीका राम कदम यांनी केली आहे. अर्णब यांच्यावर कारवाईसाठी आलेल्या ९ पोलिसांचं निलंबन करण्यात यावं, अर्णब यांच्यावर सूडबुद्धीने त्यांच्यावर आणि त्यांच्या परिवारावर केलेले आरोप मागे घ्या, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.


राम कदम यांच्या या फोटोत असं काय आहे?


दरम्यान राम कदम यांना मरिन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतलं, पोलीस स्टेशनमध्येही आपलं हे लाक्षणिक उपोषण सुरुच राहणार आहे, असं राम कदम यांनी म्हटलं आहे. राम कदम यांच्यासोबत आंदोलन करणारे कार्यकर्ते इतरत्र बसले असताना हा फोटो असल्याचं सांगण्यात येत आहे. कारण कार्यकर्त्यांसमवेतही त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर दिसून येत आहे.मात्र दुसरीकडे राम कदम यांच्या या ठिय्याचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. 


सोशल मीडियावर या फोटोवर अनेक मिम्स देखील बनवले जात आहेत. अर्णब गोस्वामी यांच्याशी संबंधित बातम्यांच्या प्रतिक्रियांवर फेसबूकवर या फोटोच्या मिम्सचे फोटो काही तरुण सतत शेअर करत आहेत.