मुंबई : मुंबईत कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रार्दुभावानंतर रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध होण्यातही अडचणी येत होत्या. अशा वेळी एमएमआरडीए प्रशासनाने कोविड 19 साठी कोट्यवधी रुपये खर्ची घालत रुग्णालयं उभारल्याचं पाहायला मिळालं. यासाठी तब्बल ५३ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना एमएमआरडीए प्रशासनाने ही माहिती दिली आहे. यामध्ये प्रत्येक बेड मागे २५ हजार रुपये खर्च झाला असून २११८ बेड तयार करण्यात आले आहेत.


अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे कोविड 19 अंतर्गत बांधलेल्या चरण 1 आणि चरण 2 मधील रुग्णालयाची विविध माहिती विचारली होती. त्यांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेसाठी एकूण ५३ कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. 


चरण 1 मध्ये सिव्हील आणि इलेक्ट्रिकल यावर १४ कोटी २१ लाख ५३ हजार ८२५ रुपये इतका खर्च झाला आहे तर द्वितीय चरणात २१ कोटी ५५ लाख २५ हजार ३५३ रुपये खर्च झाला आहे.


प्रथम चरणात उपकरणं आणि साहित्यांवर ५ कोटी २६ लाख ४७ हजार ४०६ रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर, द्वितीय चरणात १२ कोटी ६ लाख ३३ हजार २५९ रुपये खर्च करण्यात आले आहेत.  या सुविधांमध्ये ऑक्सिजन, आयसीयू, डायलिसिस, ट्रायेज यांचा समावेश आहे.


 


कोविड 19 साठी खरेदी, कामे आणि सेवा आपत्कालीन परिस्थिती व तातडीची निकड असल्याने उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय तसेच विशेष परिस्थिती आणि तातडीची खरेदी यानुसार केंद्र शासनाच्या अर्थ विभागाने निश्चित केलेल्या तरतुदीनुसार करण्यात आली आहे.