मुंबई : 10वी आणि 12 वीची परीक्षा घेऊ नये असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुचविले. खेळाडूंना सरावास परवानगी द्यावी. शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा. मुलांचं वर्ष वाया गेलंय आणि शाळा फी आकारत आहेत. सलून 2-3 खुली ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी राज ठाकरेंनी केली.  मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक वाटल्याचे ते म्हणाले. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुख्यमंत्र्यांशी झूम कॉलद्वारे संवाद साधला. यावेळी झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुन्हा एकदा लॉकडाऊन हे महाराष्ट्रातच का घडतंय ? बंगालमध्ये वैगरे निवडणूक सुरू आहेत. मात्र महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण सापडतात. इतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोजली जात नाही. तिथेही रुग्ण अधिक असणार असे राज ठाकरे म्हणाले. 


परराज्यातील कामगार परत येतील तेव्हा त्यांची टेस्ट करा असं मी मागे सांगितले होते. मात्र किती आले हेदेखील मोजलं नाही असंही ते म्हणाले. 



परत लॉकडाऊन होणं चांगलं लक्षण नाही, यामुळे नुकसान होत आहे. मोठे छोट्या व्यापाऱ्यांना उत्पादन करायला सांगितलं आहे, पण विक्रीस परवानगी नाही. छोट्या व्यापाऱ्यांना दोन ते तीन दिवस विक्रीस परवानगी द्यावी. बँक सक्तीने वसुली करत आहे, याबाबत बँकांना सूचना द्यावी. वीज बिल माफ करावं अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.  


केंद्र सरकारकडून gst येणं बाकी आहे. लोकांना दिलासा देणं गरजेचं आहे. लाट ओसरल्यावर काढून टाकलेल्या कंत्राटी कामगारांना परत घ्यावं असे ते म्हणाले. या सूचना योग्य असल्याचं मुख्यमंत्री यांनी सांगितलं.


जानेवारी शेवटाला संख्या वाढत असल्यासाचं दिसत होतं. राज्य सरकारने योग्य पावले उचलणे गरजेचं होतं. हॉस्पिटलकडे बेड असताना वापरत नसतील तर काय उपयोग ? खाजगी हॉस्पिटलने मदतीचा हात पुढे करायला पाहिजे. राज्य सरकारने या सर्व गोष्टी सक्तीने करणं गरजेचं आहे. ही वेळ नाही, नाहीतर आम्ही सक्ती काय असते ? ते दाखवून दिलं असतं असं ते म्हणाले.


हा देशाचा विषय आहे. लाट कुठेही येईल. आरोग्य याबाबत सर्वांनीच गांभीर्याने विचार करणं गरजेच असल्याचे ते म्हणाले.


अनिल देशमुख हा महत्वाचा विषय नव्हता, स्फोटकांची गाडी ठेवली हे महत्वाचं. कोणाच्या सांगण्यावरून ठेवली ? ती चौकशी व्हावी असे ते म्हणाले. सुशांतने आत्महत्या केली आणि अर्णब तुरुंगात गेला. परमबीर यांना 100 कोटींचा साक्षात्कार बदली झाल्यावर का झाला ? असा प्रश्न उपस्थित करत  बदल्यांच्या बाजार होत असतो असेही ते म्हणाले. 
 
मनसे पदाधिकारी जमीर शेखची हत्या झाली होती. महाराष्ट्र पोलिसांनी उत्तर प्रदेशला जाऊन तपास केला. नजीब मुल्ला या राष्ट्रवादीचे नेते/नगरसेवक यांनी सुपारी दिली होती हे समोर आलं आहे. याबाबत शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. नजीब मुल्लावर कारवाई होणं गरजेचं असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले.