Maharashtra Politics : आताच्या घडीची मोठी बातमी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात वर्षा बंगल्यावर (Varsha) बैठक सुरू आहे. गेल्या अर्ध्या तासापासून दोन्ही नेत्यांमध्ये खल सुरूंय. या भेटीत अंधेरी पोटनिवडणूक (Andheri Bypoll Election) आणि आगामी निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. तसच आगामी निवडणूकीत भाजप, शिंदे गट आणि राज ठाकरे एकत्र येणार का? यावरूनही तर्कवितर्क लढवले जातायेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यासोबतच भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा (MangalPrabhat Lodha) देखील वर्षा बंगल्यावर उपस्थित आहेत. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीसाठी रणनिती आखली जात असल्याचं बोललं जात आहे. अंधेरी पोटनिवडणूकीत मनसे भाजप उमेदवाराला पाठिंबा देणार का याकडे लक्ष असणार आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची गेल्या दोन महिन्यातील तिसरी भेट आहे. राज ठाकरे यांनी याआधी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांच्या गणपती बप्पाचं दर्शन घेतलं होतं. तर त्याआधी एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती.