मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हैदराबादमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या झालेल्या एन्काउंटरचे समर्थन केले आहे. राज यांनी ट्विट करून यासंदर्भात भाष्य केले आहे. कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण योग्य आणि स्वागतार्ह वाटतो, असे राज यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये पशुवैद्यक असलेल्या तरुणीवर चार तरूणांनी बलात्कार केला होता. यानंतर आरोपींनी या तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह जाळला होता. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. यानंतर पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले होते. 


मी एन्काऊंटरच्या विरोधात- असदुद्दीन ओवेसी



आज पहाटे हैदराबाद पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील आरोपींना घटनास्थळी पुराव्यांची खातरजमा करण्यासाठी नेले होते. त्यावेळी या आरोपींना पोलिसांकडील शस्त्रे हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बंदुकीतून पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चारही आरोपी ठार झाले होते. 


पोलीस आयुक्तांनी कथन केली हैदराबाद एन्काऊंटरची संपूर्ण कहाणी...


या आरोपींनी पीडितेवर अमानुषपणे अत्याचार केल्यामुळे देशभरात त्यांच्याविषयी संतापाची भावना होती. त्यामुळे अनेकांनी सायबराबाद पोलिसांच्या या कृतीचे स्वागत आहे. तर अनेकांनी हा प्रकार म्हणजे कायद्याची पायमल्ली असल्याचे सांगत पोलीस एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मानवधिकार आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली होती. मानवधिकार आयोगाकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यादृष्टीने घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी एक पथकही हैदराबादला पाठवण्यात आले होते.