महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यांवर कॅसिनोला परवानगी द्या; मनसेची शिंदे-फडणवीस सरकारकडे मागणी
महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कॅसिनोला परवानगी देण्याची मागणी मनसेने केलेय.
मनोज कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : फक्त भारतामधील नव्हे तर जगभरातील पर्यटकांचे आवडते टूरीस्ट डेस्टिनेशन म्हणजे गोवा(Goa Tour). चर्च, प्राचीन किल्ले यासह अथांग समुद्र किनारे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. मात्र, या व्यतीरीक्त आणखी एक गोष्ट पर्यटकांना आवडते ती म्हणजे कॅसिनो. गोव्यातील कॅसिनो(Goa Casino) देखील तितकेच लोकप्रिय आहेत. यामुळे पर्यटनाच्या व्यतीरीक्त या कॅसिनोच्या माध्यामातून देखील गोव्यात लाखो रुपयांची उलाढाल होते. अशाच प्रकारचे कॅसिने महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यांवर(Maharashtra, Beaches) सुरु करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कॅसिनोला परवानगी द्या
महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कॅसिनोला परवानगी देण्याची मागणी मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी केली आहे.
सरकारने पर्यटनाकडे लक्ष द्यावे
महाराष्ट्र सरकारने पर्यटनाकडे अधिक लक्ष दिले पाहीजे. जर, गोवा राज्याचं उत्पन्न हे कॅसिनोच्या माध्यमातुन वाढते. तर, समुद्र किनारी पर्यटन वाढीसाठी असणारे प्रयत्न करायला हवे.
अनेक राज्यातुन लोक गोवा आणि श्रीलंका येथे कॅसिनोसाठी जातात. गोवा सारखे कोकण किनारपट्टीवर सुद्धा कॅसिनो झाले तर आपल्या राज्याचे उत्पन्न चांगल्या रितीने नक्कीच वाढेल. तसेच रोजगाराचा देखील प्रश्न सुटायला मदतच होईल असे चव्हाण म्हणाले.
सरकारने आता आपण अपडेट होणे गरजेचे आहे. याबाबत उद्योग मंत्र्यांशी चर्चा केल्याचे मनोज चव्हाण यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा जाहीर करावा अशीही मागणी करणार असल्याचे मनोज चव्हाण म्हणाले.