मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज रंगशारदा सभागृहामध्ये पदाधिकाऱ्यांनाशी संवाद साधला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पदाधिकारी मेळाव्यात काय ठरलं?
मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांना माहिती दिली. मनसेचे सर्व नेते, सरचिटणीस आणि उपाध्यक्षांचा राज्यभर दौरा सुरु होणार असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. राज्यभर दौरा सुरु करण्याबरोबरच नोंदणी सुद्धा सुरु करणार आहोत. 


राज ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते एक पत्र देणार असून ते पत्र प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ते घरोघरी देणार आहेत. हे पत्र मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तीन भाषांमध्ये हे पत्र आहे अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.


तसंच महापालिका निवडणुकीसाठीही लवकरच जबाबदाऱ्यांचं वाटप केलं जाईल, राज्य भरातील दौरे झाल्यानंतर निवडणुकीच्या प्रक्रियेत उतरणार असल्याचंही बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. 


राज ठाकरे यांचा सभांचा धडाका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून सभांचा धडका लावला आहे. तसंच राज ठाकरे यांनी पक्षवाढीच्या हालचालींना देखील जोरदार सुरुवात केली आहे. मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे येथील सभानंतर आता मनसेकडून राज्यभर दौरा केला जाणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी पक्ष वाढीवर जोर देत आगामी महापालिका निवडणुकांसाठी आपण तयार असल्याचा इशाराच विरोधकांना दिला आहे.


राज ठाकरें यांनी मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढले नाही तर त्या मशिदींसमोर मनसेकडून (MNS) हनुमान चालीसा लावली जाणार असा इशारा राज्य सरकारला दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यामुळे राज्यभरातील वातावरण ढवळून निघालं होतं.