देवेंद्र कोल्हटकर / मुंबई : MNS On Shiv Sena's Ayodhya tour : शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आज आयोध्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी महाराष्ट्रातून शिवसेनेचे नेते आणि शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. मात्र या आयोध्या दौऱ्यावरुन सध्या शिवसेना विरुद्ध मनसे असा कलगीतुरा रंगला आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. सोबतच तब्येतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाला तर दुसरीकडे शिवसेनेचा दौरा मात्र होतोय यावरुनच शिवसेना-मनसेत आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणतात की, शिवसेनेचे नेते अयोध्येत जाऊन वल्गना करतातय पण नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली होती त्यावेळी कोकणात पोटनिवडणूक लागली होती. नारायण राणे यांची दहशत होती त्यावेळी शिवसेना नेते शेपूट घालून बसले होते. त्यावेळी फक्त राज ठाकरे शिवसेनेचा प्रचार करत होते. आत्ताचा शिवसेनेचा आयोध्या दौरा हा सेटिंग दौरा आहे. आज जे युवा नेते वल्गना करत आहेत ते त्यावेळी लॉलीपॉप चा आस्वाद घेत असतील. आमच्या दौऱ्यानंतर शिवसेनेच्या आयोध्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली. मात्र काही माकडांना हाताशी धरून आमच्या दौर्‍यात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. त्याला आम्ही महत्त्व देत नाही. भीक घालत नाही. आम्हाला ज्यावेळी जायचे तेव्हा आम्ही जाणार शिवसेनेने हिम्मतीची भाषा करु नये.


शिवसेनेने औरंगाबादचं नामांतर बासणात गुंडाळलं. एमआयएम - सपा सारख्यांशी हातमिळवणी केली. औरंगजेबाच्या कबरीच्या उदात्तीकरणाकडे दुर्लक्ष केले
आणि यावर पांघरून घालण्यासाठी सेटिंग करून अयोध्या दौरा करत आहेत. पण कितीही करा.. बुंद से गई वो हौद से नही आती, अशी टीका मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी केली आहे.


मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनीही ट्विट करत आदित्य ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे. योगेश चिले ट्विटमध्ये म्हणतात,मशिदींवरचे भोंगे हटवायची आमची हिंमत नाही, रस्त्यावरचे नमाज बंद करायची आमची कुवत नाही, कोणी हनुमान चालिसा म्हटली की आम्हाला कापरं भरतं. औरंगजेबाच्या मजारवर आमचं प्रेम, अफझलखानाची कबर आम्हाला प्यारी. ऐसेमे सिर्फ सेटींगवाले अयोद्धा टूर करके हिंदूत्व कैसे सिद्ध होगा "छोटे मा. मु."