`आम्ही एकटा जीव सदाशिव, निवडणुका एकट्याने लढणार`; बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया
MNS Raj Thackeray | Bala Nandgaokar | कुणी सोबत नाही आलं, तर एकट्यानं निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केला आहे.
मुंबई : कुणी सोबत नाही आलं, तर एकट्यानं निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केला आहे. पक्षाच्या पदाधिका-यांची अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत वांद्रे इथं महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत राज ठाकरेंनी हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक राहण्याचा कानमंत्र आपल्या नेत्यांना दिला. 21 मार्चला तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचं आवाहन राज यांनी केलंय. तसंच 2 एप्रिल रोजी शिवाजी पार्कमध्ये पक्षाचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांबाबत बैठकीत चर्चा झाली. अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
राज्यात रोज नळावरची भांडण सुरू आहेत. यात जनता राज ठाकरेंकडे बघतेय. पक्षाच्या वर्धापन दिनी राज ठाकरे यांनी ट्रेलर दाखवला आहे. पिक्चर 2 एप्रिलला गुढी पाडवा मेळाव्यात दिसणार.
आम्ही एकटा जीव सदाशिव आहोत. कोणी सोबत आले तर ठीक नाही एकटे निवडणुकीला समोर जाणार. शिवजयंती 21 मार्चला शिवाजी पार्कात मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. असंही नांदगावकरांनी म्हटलं.