मुंबई : MNS Hindutva Banner : शिवसेनेची दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे मुंबईत दसऱ्याच्या शुभेच्छा देताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेने हिंदुत्वाचा नारा दिला आहे. मनसेने शिवसेना भवना समोरच 'गर्व से कहो हम हिंदू है' चा बॅनर लावला आहे. याखेरीज मुंबईत काही ठिकाणी असे पोस्टर्स लावण्यात आलेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मनसेने केला आहे.  (MNS's slogan of Hindutva, banner put up in front of Shiv Sena Bhavan)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेची स्थापना झाली ती मुळात हिंदुत्वाचा नारा देत आणि मराठी माणसाठी शिवसेना. आता शिवसेनेचा हा मुद्दा मनसेने हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गडात अर्थात दादरमध्ये तेही शिवसेना भवनासमोर बॅनर झळकवले आहे. त्यामुळे आता शिवसेना बॅनरच्या माध्यमातून उत्तर देणार की थेट दसरा मेळाव्यात खडेबोल सुनावणार याची उत्सुकता आहे. आता या बॅनरवरुन राजकारण तापणार हे स्पष्ट होत आहे. आगामी पालिका निवडणुकीत हा मुद्दा पुढे येण्याची शक्यता आहे.



शिवसेनेचा आज दसरा मेळावा


दरम्यान, मुंबईत आज शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्याची शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या दसरा मेळाव्याला हजारो शिवसैनिक उपस्थित राहू शकणार आहेत. बंदीस्त सभागृहातील उपस्थिती मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. षण्मुखानंद सभागृहाच्या पूर्ण क्षमतेने प्रवेशाची शक्यता आहे. षण्मुखानंद सभागृहाची आसन क्षमता 3 हजार आहे. त्यामुळे या मेळाव्यात शिवसेनेचा जोश दिसणार हेच दिसून येत आहे.
 
आजच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला षण्मुखानंद सभागृहाच्या पूर्ण क्षमतेने शिवसैनिकांना प्रवेश दिला जाऊ शकतो. कारण 8 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने बंदिस्त सभागृहात 200 पेक्षा जास्त लोकांना प्रवेश देता येणार नाही, ही मर्यादा काढून टाकली आहे.