मुंबई : मोबाईल नंबर आधारकार्डला लिंक करण्याची शेवटची मुदत ही ६ फेब्रुवारी असणार आहे. सुप्रीम कोर्टात याविषयी केंद्र सरकारकडून शपथपत्र सादर करण्यात आले आहे.


केंद्र सरकारकडून शपथपत्र सादर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रीम कोर्टाने देखील याबाबतचा आदेश द्यावा, अशी भूमिका केंद्र सरकारने न्यायालयात मांडली आहे.


बँक खाते उघडतानाही आधारकार्ड अनिवार्य


केंद्र सरकारने याविषयी सुप्रीम कोर्टात सांगितलंय की, ई-केवायसी पडताळणी अंतर्गत मोबाईल युझर्सने मोबाईल नंबर आधारशी लिंक करावा, तसेच नवीन बँक खाते उघडतानाही आधारकार्ड अनिवार्य असेल, असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.


सुप्रीम कोर्टात ११३ पानांचे शपथपत्र


केंद्र सरकारने यासाठी सुप्रीम कोर्टात ११३ पानांचे शपथपत्र सादर केले. सुप्रीम कोर्टाने मोबाईलला आधार कार्ड लिंक करण्याची मुदत निश्चित केली आहे, मुदत फक्त सरकारकडून बदलली जाऊ शकत नाही. 


बँकखाते आधारकार्डला जोडण्याची मुदत ३१ मार्च


हे देखील सरकारने शपथपत्रात नमूद केले आहे. यासोबतच बँक खाते आधार कार्डला जोडण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत करण्यात आल्याचंही यावेळी सरकारने न्यायालयात सांगितलंय. आधार कार्ड लिंक करणे म्हणजे, 'राइट टू प्रायव्हसी'चा भंग असल्याचा आक्षेप जनहित याचिकांद्वारे घेण्यात आला आहे.