गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. अनेक मंडळांनी आपल्या मंडळांच्या गणेश मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली आहे. अशातच चिंचपोकळीचा चिंतामणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणरायाचा आगमन सोहळा आज पार पडला आहे. दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी मिळाल्याने सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे आज चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीच्या आगमनावेळी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र चिंतामणी गणपीच्या मिरवणूकीत चोरांची चांदी झाल्याचे पाहायला मिळाले. चिंचपोकळीचा चिंतामणी या गणपतीच्या आगमन सोहळ्यादरम्यान गणेशभक्तांचे 50 हून अधिक मोबाईल चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आता काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


चिंतामणी गणपतीची मिरवणूक सुरु असताना मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्याचाच फायदा घेत चोरांनी आपले हात साफ केले. 50 पेक्षा अधिक जणांचे मोबाईल यावेळी चोरीला गेले आहेत. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.