मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन महत्त्वाच्या धरणांपैकी एक असलेलं वैतरणा धरण आज ओव्हरफ्लो झालं. या धरणाचे दोन दरवाजे उघडले आहेत. गेल्या आठवडाभरापासून शहापूर तालुक्यांतील धरणांच्या परिसरात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास तानसा आणि भातसा ही धरणंही लवकरच भरतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैतरणा धरण भरलं असून धरणाचा पहिला दरवाजा 9:24 ला तर दुसरा दरवाजा 9:35 ला उघडला गेला आहे. आता लवकरच तानसा धरणही भरणार आहे. तानसा धरण भरण्यासाठी आणखी 2:50 फूट लेवल बाकी आहे.


दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडकसागर तलाव देखील ओसंडून वाहू लागला आहे. मुंबई शहरासाठी जीवनवाहिनी असलेला तसेच वर्षभर शहराला पाणीपुरवठा करणा-या प्रमुख सात तलावांपैकी एक असलेला मोडकसागर तलाव आज रात्री ९.२४ वाजता ओसंडून वाहू लागला आहे.


गेल्यावर्षी हा तलाव २६ जुलै २०१९ रोजी भरुन वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षी दिनांक १५ जुलै २०१८ रोजी ओसंडून वाहू लागला होता.