मुंबई : मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. 2017 मध्ये लागलेल्या आगीनंतर बंद पडलेली मोनोरेलचा पहिला टप्पा (चेंबूर ते वडाळा) आजपासून पुन्हा एकदा सुरू झालाय. एमएमआरडीएचा मोनोरेलचा पहिला आणि दुसरा टप्पा एकाच वेळी सुरू करण्याचा मानस होता. परंतु, यापूर्वी पार पडलेल्या एका बैठकीत केवळ पहिला टप्पा पुर्ववत सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे मुंबईकरांना मोनोरेलचा दुसऱ्या टप्पा (वडाळा ते सातरस्ता) सुरू होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

9 नोव्हेंबर 2017 रोजी पहिल्या टप्प्यातील मोनोरेलच्या दोन कोचला आग लागली होती. यानंतर मोनोरेल सेवा पूर्णत: ठप्प झाली होती. ती आजपासून पुन्हा सुरू करण्यात आलीय. 


मोनोरेलच्या पहिल्या टप्प्यातील मार्गावर म्हणजेच वडाळा ते चेंबूर या मार्गावर दररोज 18,000 ते 20,000 प्रवासी प्रवास करतात. मोनोरेल बंद पडल्यानं एमएमआरडीए प्रशासनाला प्रत्येक महिन्याला 1 करोड 80 लाख रुपयांचा भार सहन करावा लागत होता. 


दुसरा टप्पा कधी?
मिळालेल्या माहितीनुसार, मोनोरेलचा दुसरा टप्पा 2 फेब्रुवारी 2019 पासून सुरू करण्यात येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, मंबई मोनोरेल ही देशातील पहिली मोनोरेल सेवा आहे.