मुंबईत आता दुसऱ्या टप्प्यातील मोनो वडाळा ते जेकब सर्कल धावणार!
दुसऱ्या टप्प्यातील मुंबई मोनोरेलला आगामी आठड्यापासून सुरूवात होण्याची शक्यता आहे.
मुंबई : दुसऱ्या टप्प्यातील मुंबई मोनोरेलला आगामी आठड्यापासून सुरूवात होण्याची शक्यता आहे. वडाळा ते जेकब सर्कल दरम्यान २७ फेब्रुवारीपासून दुसऱ्या टप्प्यातील मोनोरेलला सुरू होण्याची शक्यता आहे. प्रत्येक २० मिनिटांनी मोनोरेल प्रवाशांच्या सोयीसाठी धावणार असून सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत मोनोरेल धावणार आहेत. दररोज जवळपास १३२ मोनोरेलच्या फेऱ्या असणार आहेत.
मोनोरेल स्थानके आणि इतर सुविधा बांधल्यानंतर तब्बल दहा वर्षांनी दुसऱ्या टप्प्यातील मोनोरेलला सुरूवात होणार आहे. यापूर्वी चेंबूर ते वडाळा दरम्यान पहिल्या टप्प्यातील मोनोरेल २०१४मध्ये सुरू करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मोनोरेलमुळे आता जवळपास एक लाख प्रवासी मोनोरेलनं प्रवास करु शकणार आहेत. आता चेंबूर ते जेकब सर्कल दरम्यानचं तिकीट दहा ते ४० रुपयापर्यंत असणार आहे.