मोनोरेलकडे नेमकं लक्ष देणार तरी कोण?
प्रवाशांना मोनोरेल बंदचा त्रास सहन करावा लागत आहे. अजून किती वेळ लागेल याबाबतही प्रशासनाकडून काहीही सांगण्यात आलेलं नाही.
मुंबई : गुरुवारी म्हैसूर कॉलनी स्टेशनला उभी असलेल्या मोनोरेलच्या एक डब्याला आग लागली. तेव्हापासून मोनो पूर्णपणे ठप्प आहे. 28 तास उलटूनही ही मोनोरेल अद्याप म्हैसूर कॉलनी स्टेशनलाच उभी आहे.
प्रवाशांना मोनोरेल बंदचा त्रास
मोनोरेल प्रशासनाला अजूनही हा डबा किंवा रेक बाजूला काढता आलेला नाही. त्यामुळे प्रवाशांना मोनोरेल बंदचा त्रास सहन करावा लागत आहे. अजून किती वेळ लागेल याबाबतही प्रशासनाकडून काहीही सांगण्यात आलेलं नाही.
आग लागल्यापासून मोनोरेल ठप्प
गुरुवारी सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ही दुर्घटना म्हैसूर कॉलनी स्टेशनला घडली होती. मोनोरेलच्या मागच्या डब्याला आग लागली. मागच्या इंजीनला आग लागल्यामुळे इंजिनच्या बाजूचा डबा आगीत पूर्णपणे जळून खाक झाला. तेव्हापासूनच ही मोनोरेल सेवा पूर्णपणे ठप्प झाली.