Monsoon Update: मुंबईसह (Mumbai) पुणे (Pune), ठाणे (Thane) आणि इतर जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपलं आहे. दरम्यान उद्याही मुसळधार पाऊस (Heavy Rain) कायम राहण्याची शक्यता असून हवामान विभागाने (IMD) इशारा दिला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. हवामान विभागाने मुंबई, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यांना पुढील 24 तासांकरीता अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरीकांनी सतर्क रहावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असं मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आलं आहे. 


मुंबईत पुढील 2 दिवस असाच पाऊस कोसळण्याचा अंदाज 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईमध्ये पुढील दोन आठवड्यांमध्ये मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 'स्कायमेट' या खासगी हवामान संस्थेनं पुढील दोन आठवडे कसा पाऊस पडणार आहे याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढल्या दोन आठवड्यांमध्ये मुंबईत कसा असणार आहे पाऊस जाणून घेऊयात...


25 जुलै - ठराविक ठिकाणी प्रचंड पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 
26 जुलै - विजांच्या कडकडाटासहीत मुंबईमध्ये पाऊस पडेल असा अंदाज आहे.
27 जुलै - शनिवारीही मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासहीत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
28 जुलै - रविवारी मुंबईकरांना सूर्याचं दर्शन होऊ शकतं आणि पाऊस विश्रांती घेईल असा अंदाज आहे.
29 जुलै - सोमवारी रविवारच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
30 जुलै - 30 जुलैपासून पुढील 9 दिवस जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस मुंबईकरांना पहायला मिळेल असा अंदाज आहे. 
31 जुलै - बुधवारीही मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासहीत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
1 ऑगस्ट - नव्या महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
2 ऑगस्ट - पुढल्या शुक्रवारी मुंबईमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडून फ्लॅश फ्लडची शक्यता आहे.