BREAKING : मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतरही 4 आमदार गुवाहाटीत शिंदे गटात दाखल
एकनाथ शिंदे यांच्या गटात आणखी 4 आमदारांची वाढ झाली आहे. शिवसेनेचे 38 आमदार त्यांच्यासोबत आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना परत येण्याचं आवाहन केल्यानंतर ही शिवसेनेचे 4 आमदार शिंदे गटात पोहोचले आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांसोबत गुवाहटीच्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यांच्या गटात आता आणखी 4 आमदार दाखल झाले आहेत. (More 4 Shivsena MLA Reached in Guvahati to join shinde group)
गुवाहटीला गेलेल्या आमदारांमध्ये गुलाबराव पाटील, चंद्रकांत पाटील, योगेश कदम, मंजुळा गावित यांचा समावेश आहे. हे चारही आमदार हॉटेलमध्ये पोहोचताच त्यांचं इतर आमदारांनी स्वागत केलं. या आमदारांना एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतरही हे 4 आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाले आहेत.
1 गुलाबराव पाटील - मंत्री महोदय - जळगाव ग्रामीण
2 योगेश कदम - आमदार - दापोली
3 चंद्रकांत दादा पाटील - मुक्ताई नगर
4 मंजुळा ताई गावित - साक्री - धुळे
शिवसेना आणि महाविकासआघाडीचं टेन्शन वाढत आहे. कारण जसे जसे शिंदे गटातील आमदारांची संख्या वाढत आहे. तसं सरकार अस्थिर होत चाललं आहे. एकनाथ शिंदे यांनी आधीच आपल्यासोबत 46 आमदार असल्याचा दावा केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच मोठी फूट पडताना दिसत आहे. शिवसेनेचे आणखी काही आमदार शिंदे गटात सहभागी होतात का याबाबत आता उत्सूकता वाढत आहे. तर शिवसेनेचं टेन्शन वाढत आहे.