मुंबई : आतापर्यंतच्या ताज्या घडामोडी... मध्य रेल्वेवर 18 तासांचा जम्बो ब्लॉक... ओमायक्रॉनचा वाढता धोका...मुंबईत मोकळ्या जागांवर होणाऱ्या मोठ्या पार्ट्यांवर निर्बंध...  इत्यादी महत्त्वाच्या बातम्या वाचा आणि राहा उपडेट....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. आज सकाळी 8 वाजल्यापासून सोमवारच्या मध्यरात्री 2 वाजेपर्यंत मध्य रेल्वेवर 18 तासांचा जम्बो ब्लॉक...पाचव्या, सहाव्या मार्गांसाठी दिवा-ठाणे स्लो मार्गावरील वाहतूक बंद...लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द... त्यामुळे सर्व लोकल दिवा आणि मुलुंडदरम्यान फास्ट मार्गावरून जातील. त्यामुळे मुंब्रा तसंच कळवा स्थानकांवर लोकल उपलब्ध नसतील. या जम्बो ब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्यात... 


2. फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार आहे.. राष्ट्रीय कोविड-19 सुपरमॉडेल समितीने हा अंदाज वर्तवलाय. 2022 च्या फेब्रुवारीमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे... कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळेच देशात कोरोनाची तिसरी लाट येईल.. तिस-या लाटेत देशात दररोज किमान 2 लाख कोरोनाचे रूग्ण आढळून येण्याची शक्यता आहे.. 


3. राज्यात दीड कोटी नागरिक लसीकरणापासून दूर आहेत. यात सर्वाधिक 13 लाख 83 हजार नागरिक ठाणे जिल्ह्यातील आहेत. या खालोखाल नाशिक, जळगाव, नगर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. लसीकरणाचा वेग वाढला असला तरी 15 टक्के नागरिकांना लशीची पहिली मात्रा देणं बाकी आहे.


4. तापमानात घसरण झाल्याने मुंबईसह राज्यभरात हुडहुडी...नाशिक, परभणी, पुणे, महाबळेश्वरमध्ये पारा घसरला...राज्यात आणखी 4 दिवस थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता...


5. मुंबईत मोकळ्या जागांवर होणा-या मोठ्या पार्ट्यांवर निर्बंध...हॉल, बंदिस्त जागी क्षमतेच्या 50% मर्यादेपर्यंतच प्रवेश...तर घरातल्या पार्ट्यांवरही निर्बंध...महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांचे आदेश...


6. एकाच टेस्टिंग किटमधून डेल्टा आणि ओमायक्रॉनची ओळख पटणार आहे. पुण्यातील जीनपॅथ डायग्नोस्टिक्सनं डेल्टा आणि ओमायक्रॉन प्रकारातील फरक ओळखण्यासाठी ‘कोविडेल्टा’ हे भारतीय बनावटीचं टेस्टिंग किट विकसीत केलंय. आयसीएमआरनं या टेस्टिंग किटला मान्यता दिलीय.


7. ओमायक्रॉनचे शनिवारी राज्यात 8 नवीन रुग्ण आढळून आलेत. या 8 पैकी 4 मुंबईत, 3 साताऱ्यात आणि 1 रुग्ण पुण्यातील आहे. नव्या रुग्णांमुळे आता राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 48 वर गेलीये.. यातील 28 रुग्णांना डिस्जार्ज देण्यात आलाय. 


8. मुंबई महानगरपालिकेच्या ‘केईएम’ रुग्णालयात आता खासगी रुग्णालयांप्रमाणे उपचार मिळणार आहेत. यासाठी 10 टक्के खाटांचा वेगळा वॉर्ड तयार करण्यात येणारेय.. या ‘पेड बेड’ उपक्रमामुळे खासगी रुग्णालयांना प्राधान्यक्रम देणा-या रुग्णांनाही पालिकेच्या दर्जेदार उपचारांची सुविधा मिळणारेय.. 


9. कर्नाटकात काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसही आक्रमक झालीय...कन्नडीकांचा निषेध केलाय...याच पार्श्वभूमीवर रविवारी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा आहे...त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जाऊन महाराजांना दुधाचा अभिषेक करणार आहेत अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिली...