मुंबई : मुलुंडमधील नाणेपाडा परिसरात शिरलेल्य बिबट्याने सहा जणांना जखमी केलं. या बातमीची दिवसभर चर्चा होती. पण तेवढीच चर्चा भाजपाचे खा. किरीट सोमय्या यांच्या सेल्फीचीदेखील झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेटकऱ्यांनी खा. सोमय्या यांना सोशल मीडियावर 'ट्रोल' केले. 



 जखमी इसमासोबतचा सेल्फी खा. सोमय्या यांनी ट्वीट करत बिबट्याच्या हल्ल्याविषयी माहिती दिली. 



भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी जखमींबरोबर सेल्फी काढून आपल्या असंवेदनशीलतेचं दर्शन घडवल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले. 


सेल्फीत व्यस्त 



सोमय्या एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी हे फोटो आपल्या ट्विटरवर पोस्टही केले.



स्थानिक रहिवाशांमध्ये या घटनेने भीतीचे वातावरण असताना त्यांचे खासदार मात्र सेल्फी काढण्यात व्यस्त होते. 



खासदारांची 'शाळा'


हल्ला करणारा वाघ नव्हता तर बिबट्या होता अशी खोचक सूचना यावेळी करण्यात आली. तर 'सोमय्या यांना इथे पण वाघ दिसतोय' असे म्हणत खिल्ली उडविली आहे. 'इथे पण गरबा खेळायला गेले का ?' असा प्रश्नदेखील विचारण्यात आला. 



पोलिसांसोबतही सेल्फी 


बिबट्याने नाणेपाडा परिसरात सहा जणांवर हल्ला केल्याची माहिती मिळताच स्थानिक खासदार सोमय्या त्या ठिकाणी आले. 


बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांसह इथे आलेल्या पोलिसांबरोबरही त्यांनी सेल्फी काढले.