Sanjay Raut : राज्य सरकारवर आणि गृहमंत्र्यांवर खासदार संजय राऊत यांचे गंभीर आरोप
Sanjay Raut : राज्य सरकारवर आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलाय. राज्यात सरकार पुरस्कृत गुंडगिरी, दहशतवाद, दंगली होत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
Sanjay Raut : राज्य सरकारवर आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलाय.तक्रारीला सरकार स्टंटबाजी म्हणत असल्याचा आरोप त्यांनी केला. 'तोंड उघडलं तर भूकंप होईल' असं राऊत म्हणाले. राज्यात सरकार पुरस्कृत गुंडगिरी, दहशतवाद, दंगली होत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. हे सरकार आल्यापासून दंगली भडकवत आहे असं राऊत म्हणाले.
संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा होणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा होणारच असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सांगितले आहे. 2 एप्रिलला होणाऱ्या या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज पुन्हा एकदा सभास्थळाची पाहणी केली. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि सुभाष देसाई यावेळी उपस्थित होते. संभाजीनगरमध्ये झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या सभेसाठी काही अटी आणि शर्ती देखील घालून दिल्या आहेत.
संजय राऊत यांना जीवेठार मारण्याची धमकी
खासदार संजय राऊत जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज आलाय...गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकीचा मेसेज राऊतांच्या फोनवर आला. त्या मेसेजमध्ये तुमचा सिद्धु मुसेवाला करू अशी धमकी देण्यात आली आहे. या मेसेजमधून राऊतांना शिव्याही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, फक्त संजय राऊतच नाही तर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही धमक्यांचे मेसेज येत आहेत, असा आरोप आमदार सुनील राऊत यांनी केला आहे. वारंवार तक्रारी देऊनही पोलीस कोणतीही कार्यवाही करत नाहीत, असं सुनील राऊत म्हणाले. आमदार सुनील राऊत हे कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात धमक्यांबाबत तक्रार दिली आहे.
राऊत यांना धमकीचा आलेला मेसेज
-हिंदू विरोधी मार डालुंगा तुझे
-दिल्ली मे मिल एके ४७ से उडा दुंगा मुसेवाला टाईप
-लॉरेन्स की ओर से मेसेज है सोच ले XXX
-सलमान और तू फिक्स
-दिल्लीत राऊत आल्यास त्यांना एके 47 ने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. सलमान खान आणि राऊतांनी आता तयार राहावं, असा इशारा देण्यात आलाय. या धमकीप्रकरणी पुण्यातून राहुल तळेकरला गुन्हे शाखेने काल रात्री उशिरा अटक केली. धमकीची चौकशी करण्यासाठी आता राऊतांच्या निवासस्थानी कांजूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दाखल झालेत त्यांनी धमकी प्रकरणात राऊतांचे भाऊ सुनील राऊतांकडून माहिती घेतली.