Sanjay Raut On Adipurush: ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' या चित्रपटाबाबत प्रदर्शनाच्या आधीच बऱ्याच चर्चा तयार झाल्या आणि नंतर त्यामध्ये भर पडली ती म्हणजे विविध राजकीय मुद्द्यांची. काहींनी तर, या चित्रपटाची निर्मितीच ठराविक हेतूनं झाल्याचं खळबळजनक वक्तव्यही केलं. वादाच्या याच भोवऱ्यात अडकलेलं असताना चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रभास, क्रिती सेनन, देवदत्त नागे यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा 'आदिपुरुष' प्रेक्षकांच्या भेटीला आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोट्यवधींचा निर्मिती खर्च आणि लोकप्रिय कलारांचे चेहरे मात्र या चित्रपटाला तारु शकले नाहीत असंच म्हणावं लागेल. मुख्य म्हणजे एकिकडे जिथं समीक्षकांसह प्रेक्षकांनीही या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया दिल्या तिथंच दुसरीकडे या Negative Publicity मुळंही चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांमध्ये मात्र वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. 


संजय राऊतांचा संताप, सत्ताधाऱ्यांना थेट सवाल विचारत म्हणाले...


फक्त प्रेक्षकच नव्हे तर, काही राजकीय मंडळींनीसुद्धा 'आदिपुरुष'वर सडकून टीका केली. यात आघाडीवर असणारं नाव म्हणजे खासदार संजय राऊत यांचं. चित्रपटाला होणारा एकंदर विरोध पाहता त्यात हिंदुत्वाचा तमाशा लावल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. 


हेसुद्धा पाहा : क्रिती सेननआधी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही साकारलेली सीता; पाहा ...


एकिकडे अनेक हिंदू संघटना आणि प्रेक्षकांनी चित्रपटातील पात्रांची भाषा, त्यांचे संवाद यांवर आक्षेप घेतला असतानाच बिकीनीवरून तमाशा घालणारे आता शांत का आहेत? असा थेट सवाल भाजप नेत्यांना अनुसरून विचारला. 


विरोधी पक्ष कमकुवत होतोय का? 


चित्रपटामागोमाग जेव्हा त्यांना पक्षांतर्गत वादाबाबतच अप्रत्यक्ष प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी 23 जून रोजी पाटना येथे होणाऱ्या बैठकीचा संदर्भ देत तिथं उद्धव ठाकरे, शरद पवार आणि देशभरातील कार्यकर्त्यांची हजेरी असेल असं सांगत आपण आणि मित्रपक्ष कायम एकत्र होतो आणि यापुढंही एकत्र असू असं स्पष्ट केलं. 


यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या मनिशा कायंदे यांनी पक्षातून काढता पाय घेत शिंदे गटाशी हातमिळवणी केल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. 'त्या कुठून आल्या, कुठे गेल्या किंबहुना त्यांना पक्षात कोणी आणलं या साऱ्याचा मला काहीच फरक पडत नाही', अशा कठोर शब्दांमध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत अशा व्यक्तींना त्यांनी केर म्हणत तोफ डागली.