Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde Fadanvis Government) मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला. पहिल्या टप्प्यात 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात शिंदे गटाकडून 9 तर भाजपकडून 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मंत्रीपदासाठी जुन्या जाणत्यांना संधी देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकाही महिला आमदाराला संधी देण्यात आलेली नाही. शिंदे गटात सहभागी झालेल्या यामिनी जाधव (yamini jadhav), लता सोनावणे (Lata Sonavane) यांना तर भाजपकजून मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांची मंत्रिमंडळात वर्णी लागले असं बोललं जात होतं. पण अंतिम 18 मंत्र्यांच्या यादीत एकाही महिला नेत्याचा समावेश नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार पुरुषप्रधान असल्याची चर्चा रंगली आहे.


सुप्रिया सुळे यांची टीका
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही या मंत्रिमंडळावार टीका केली आहे. राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे, स्वतः पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ 'होम मेकर' असू नयेत तर त्या 'नेशन बिल्डर' असाव्यात असं ते सांगतात, असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.



दरम्यान, शिंदे-फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला. उशीरा का होईना राज्याला मंत्री मिळाले ही आनंदाची बाब आहे. मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.


शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात 'या' नेत्यांना संधी
राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. 


शिंदे गटातील मंत्री 


गुलाबराव पाटील (कॅबिनेट)
दादा भुसे (कॅबिनेट)
संजय राठोड (कॅबिनेट)
संदीपान भुमरे (कॅबिनेट)
उदय सामंत (कॅबिनेट)
तानाजी सावंत (कॅबिनेट)
अब्दुल सत्तार (कॅबिनेट)
दीपक केसरकर (कॅबिनेट)
शंभूराज देसाई (कॅबिनेट)


भाजपतील मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील (कॅबिनेट)
सुधीर मुनगंटीवार (कॅबिनेट)
चंद्रकांत पाटील (कॅबिनेट)
विजयकुमार गावित (कॅबिनेट)
गिरीश महाजन (कॅबिनेट)
सुरेश खाडे (कॅबिनेट)
रवींद्र चव्हाण (कॅबिनेट)
अतुल सावे (कॅबिनेट)
मंगलप्रभात लोढा (कॅबिनेट)