मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मग ते रिलायन्स कंपनीशी संबंधित काही बातमी असेल अथवा पर्सनल लाईफ असेल. गेल्या महिन्यात मुकेश अंबानींचा मुलगा आकाश अंबानीचा साखरपुडा झाला. या शाही साखरपुड्याची चांगलीच चर्चा झाली होती. यानंतर टी-२० स्पर्धेदरम्यान नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांच्यावरच फोकस होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता मुकेश अंबानीची सध्या जोरदार चर्चा होतेय. ही चर्चा होतेय ती तिच्या हॉट फोटोशूटमुळे. इशा अंबानी रिलायन्स जिओची प्रोजेक्ट हेड आहे. याशिवाय फॅशन पोर्टल एजीओही ती सांभाळते. 



२०१५मध्ये लाँच झाले होते एजीओ


रिलायन्सचा फॅशन पोर्टल एजीओ २०१५मध्ये लाँच करण्यात आले. याच्या लाँचिंगसाठी इशा अंबानीने सगळ्यात महागडे हॉट फोटोशूट केले होते. यानंतर इशा अधिक चर्चेत आली होती. इशा अंबानीचा नवा लूक समोर आलाय. इशाचे हे फोटोशूट फेमिना मॅगॅझिनसाठी केले होते. 


फोटोशूटमध्ये होता असा लूक


फेमिना मॅगॅझिनसाठी इशाचे हे फोटोशूट तिच्या मुंबईतील अँटिलिया या घरात झाले होते. यात ती ऑफिशियलपासून ते जंपसूटमध्ये दिसतेय. बॉलीवूडमधील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट मिक्की कॉन्ट्रॅक्टरने फोटोशूटसाठी तिचा मेकअप केला होता.