मुलुंड एटीएम क्लोनिंग प्रकरण : तपासात धक्कादायक खुलासे
मुलुंड एटीएम क्लोनिंग प्रकरणात नवघर पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्यात. यातील दोन आरोपी रोमानियन नागरिक आहेत. पोलीस तपासात या सर्वांनी धक्कादायक खुलासे केलेत.
मुंबई : मुलुंड एटीएम क्लोनिंग प्रकरणात नवघर पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्यात. यातील दोन आरोपी रोमानियन नागरिक आहेत. पोलीस तपासात या सर्वांनी धक्कादायक खुलासे केलेत.
१८ डिसेंबर रोजी मुलुंडच्या कोटक महिंद्रा बँकेतून पैसे काढलेल्या ग्राहकांना त्यांच्या खात्यातून दिल्ली आणि गाझियाबादमधून पैसे काढल्याचा मॅसेज आला. सुमारे ३२ लाख रुपये एटीएम क्लोनिंग करून काढण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं.
नवघर पोलिसांनी तात्काळ विशेष पथक तयार करून मुंबई आणि दिल्लीतून मीयु आयोनेल, मारियन ग्रामा, गणेश शिंदे आणि पुंडलीक हडकर या चार आरोपींना बेड्या ठोकल्या.
त्यांच्या लॅपटॉपमध्ये दीड हजार ग्राहकांचा डेटा मिळाला. एटीएम क्लोनिंगचे प्रकार अनेकदा समोर आलेत. त्यामुळे एटीएमचा वापर करताना खबरदारी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय.