COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित जोशी,  झी मीडिया, मुंबई : २१ ऑगस्ट ते २३ सप्टेंबरदरम्यान ऐरोली आणि मुलुंड टोल नाक्यावर लहान वाहनांना टोल मुक्ती मिळालीय. मुंब्रा बायपासमुळे होणारी वाहातुक कोंडी टाळण्यासाठी हा उपाय  करण्यात आलाय. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळतर्फे हा निर्णय घेण्यात आलाय. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात माहिती दिली.


तुर्तास दिलासा  


ठाणे जिल्हात आणि मुलुंडमध्ये साधारण १९ टोलनाके आहेत. यामध्ये मुलुंड आनंद नगर, ऐरोली, खारेगाव, एलबीएस आणि घोडबंदर वरचे टोलनाके हे वर्दळीचे आहेत. मुंबईहून पुणे, नाशिकला जाण्यासाठी हेच टोलनाके पार करावे लागतात. ऐरोलीवरून ठाण्याच्या दिशेने जायचं झाल्यास एरोली आणि आनंद नगर हे दोन्ही टोलनाके पार करावे लागतात. यामध्ये प्रचंड गर्दीचा सामनना वाहनचालकांना दररोज करावा लागतो. स्थानिक ठाणेकरही या प्रवासाला चांगलेच वैतागले होते.


वारंवार यासंदर्भात तक्रारी करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळतर्फे घेण्यात आलेल्या निर्णयानंतर मुलुंड टोलनाक्यावर  वाहनचालकांना तुर्तास दिलासा मिळालायं. यामुळे थोड्याफार प्रमाणात गर्दी कमी होणार आहे.