देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई: गोरेगावकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. पी दक्षिण विभागातील वीरवानी इंडस्ट्रीयल इस्टेट, पश्चिम द्रुतगती मार्ग, गोरेगांव (पूर्व) येथील जलवाहिनी बदलण्याच्या कामास्तव दिनांक 23 ते 24 एप्रिल दरम्यान 24 तासांसाठी काही भागांत 100 टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे,

 

मुंबई महानगरपालिकेतर्फे पी दक्षिण विभागातील वीरवानी इंडस्‍ट्रीयल इस्‍टेट, पश्चिम द्रुतगती मार्ग, गोरेगाव (पूर्व) येथे सद्यस्थितीत असलेल्‍या 600 मिलीमीटर व्‍यासाची जलवाहिनी बदली करुन 900 मिलीमीटर व्‍यासाची जलवाहिनी टाकण्‍याचे काम मंगळवार, 23 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेपासून बुधवार दिनांक 24 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत (एकूण 24 तासांसाठी) हाती घेण्‍यात येणार आहे. या कालावधीत काही भागांत 100 पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. 

100 टक्के पाणीपुरवठा बंद राहणारा भाग:


पी दक्षिण विभाग - वीटभट्टी, कोयना वसाहत, स्‍कॉटर्स वसाहत, कामा इंडस्‍ट्रीयल इस्‍टेट, रोहिदास नगर व शर्मा इस्‍टेट इत्‍यादी (मंगळवार, दिनांक 23 एप्रिल)

 

पी पूर्व विभाग - दत्त मंदीर मार्ग, दफ्तरी मार्ग, खोत कूवा मार्ग, खोत डोंगरी, मकरानी पाडा आणि हाजी बापू मार्ग, तानाजी नगर, कुरार गांव, रहेजा संकुल, साईबाबा मंदीर, वसंत व्‍हॅली, कोयना वसाहत (मंगळवार, दिनांक 23 एप्रिल )

 

आर दक्षिण विभाग – बाणडोंगरी, कांदिवली (पूर्व) (मंगळवार, दिनांक 23 एप्रिल)

 

पी दक्षिण विभाग - पांडुरंगवाडी, गोकूळधाम, जयप्रकाश नगर, नाईकवाडी, गोगटेवाडी, कन्‍यापाडा, कोयना वसाहत, आय. बी. पटेल मार्ग, यशोधाम, संतोष नगर, विश्‍वेश्‍वर मार्ग, प्रवासी इंडस्‍ट्रीयल इस्‍टेट, राजीव गांधी नगर, आरे मार्ग, श्रेयस वसाहत इत्‍यादी (बुधवार, दिनांक 24 एप्रिल ) 

 

पी पूर्व विभाग - पिंपरी पाडा, पाल नगर, संजय नगर, एम. एच. बी. वसाहत, इस्‍लामिया बाजार, जानू कम्पाउंड, शांताराम तलाव, ओमकार लेआऊट, पिंपरी पाडा, चित्रावणी, स्‍वप्‍नापूर्ती, घरकुल, गोकूळधाम, यशोधाम, सुचिताधाम, दिंडोशी डेपो, ए. के. वैद्य मार्ग, राणी सती मार्ग (बुधवार, दिनांक 24 एप्रिल 2024)

 

सबब, संबंधित भागांमधील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.