आमिर खानच्या अंगरक्षकांनी झी मीडियाच्या पत्रकाराला धमकावलं
आमिर खानच्या खासगी अंगरक्षकांनी, झी मीडियाच्या पत्रकाराला धमकावल्याचा प्रकार समोर आलाय.
मुंबई : आमिर खानच्या खासगी अंगरक्षकांनी, झी मीडियाच्या पत्रकाराला धमकावल्याचा प्रकार समोर आलाय. पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणाऱ्या इम्रान खान यांनी आमिर खानला शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण दिलं आहे. त्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यासाठी झी मीडियाची प्रतिनिधी आमिरच्या मुंबईतल्या वांद्रे इथल्या घरी गेली. त्यावेळी आमिर घरातून बाहेर जात होता. म्हणून त्याची प्रतिक्रिया मिळवण्यासाठी, झी मीडियाच्या प्रतिनिधीनं त्याच्या गाडीचा पाठलाग सुरु केला. तेव्हा आमिरच्या अंगरक्षकांनी झी मीडियाच्या प्रतिनिधीशी वाद घालत, तिला धमकावलं.