Kiran Mane : राज्यातील ​'वक्फ' मंडळाचं बळकटीकरण करण्यासाठी सरकारनं 10 कोटींच्या निधीची तरतूद ​केलीय. त्यापैकी 2 कोटी रुपये ​10 जूनला वितरीत केल्याचा शासन आदेश अल्पसंख्यांक विकास विभागानं काढला आहे. राज्यात महायुती सरकार सत्तेत येताच 'वक्फ' बोर्डाच्या (waqf board) जागांवरून रान उठलं होतं. अनेक ठिकाणी मोर्चे काढून जोरदार विरोध झाला होता. आता महायुती सरकारनं अवघ्या दोन वर्षात ​'वक्फ' मंडळांला अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुनच मराठी अभिनेत्री केतकी चितळेने महायुती सरकारवर संताप व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केतकी चितळेचा व्हिडिओ व्हायरल
केतकी चितळेने (Ketaki Chitale) आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तीने शिंदे सरकारने वक्फ बोर्डाला जाहीर केलेल्या 10 कोटी रुपयांच्या निधीवरुन सुनावलं आहे. तुम्ही दळिद्रीपणा करणार आहात का? तुम्ही हिंदूही नकोत असं ठरवलं आहे का? वक्फ बोर्डाला रद्द करा यासाठी मोर्चे निघत आहेत आणि तुम्ही त्यांना 10 कोटी रुपये मंजूर करत आहात. आधीच तीन तिघाडी सरकार आहे तुमचं. तुमच्या बाजूला हिंदूही नकोत असं ठरवलं आहे का? तुमचं म्हणणं काय आहे?," अशी विचारणा केतकी चितळेने केली आहे. 


किरण माने यांची पोस्ट
केतकी चितळे हिने पोस्ट केल्यानंतर अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने (Kiran Mane) यांनी टोला लगावला आहे. किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय ' केतकी... तुझ्या दु:खात खुप आनंदानं सहभागी आहोत आम्ही. गेली दहा वर्ष आम्हाला आईबहिणीवरुन ट्रोल करणार्‍या पिलावळीचा 'आतला' अख्खा दर्द तू या व्हिडीओतून पिळवटून ओतलास आणि आमच्या दहा वर्षांच्या संघर्षाचं सोनं केलंस ! लै लै म्हंजी लैच ठैंक्यू...' असं किरण माने यांनी म्हटलं आहे.



काय म्हणालीय केतकी चितळे
"इतकी धक्कादायक बातमी वाचून उठली आहे की काय बोलावं कळत नाही आहे. ज्या लोकांनी तुम्हाला मतही दिलं नाही त्याचं बळकटीकरण करण्यासाठी तुम्ही 10 कोटी रुपये देत आहात. तुम्ही बधीर आहात की आम्हाला बधीर करुन सोडणार आहात. मी नेहमी म्हणत होते की, लोकसभा निवडणुकीत कोणाला मत द्यायचं हे ठरलं आहे. कारण मला माझा पंतप्रधान कोण हवा आहे हे पाहून मत दिलं होतं. पण विधानसभेत कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न पडणार आहे. हे मी पूर्वीपासून बोलत होते. पण आता तर तुम्ही माझं मत ठाम करुन सोडलं आहे. 


एकजण परत आपल्या काकांकडे जाऊन काका माझं चुकलं, मला माफ कर. मला परत घे असं म्हणणार आहे का? दुसरी व्यक्ती तीनचाकी सायकल चालवता येत नाही, डोक्यात हवा गेली आहे म्हणून परत मी तीनचाकी रिक्षा चालवायला निघतो असं म्हणणार आहे आणि तिसऱ्याचं काय राजीनामाच स्विकारला जात नाही. म्हणून यापद्दतीने तुम्ही दळिद्रीपणा करणार आहात का?  असा सवाल केतकी चितळेने आपल्या व्हिडिओतून विचारला आहे.