मुंबई : मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात अवघ्या सहा दिवसांची चिमुरडी मृत्यूला झुंज देत आहे. सहा दिवसांची चिमुरडी आरजू अंसारीच्या ह्रदयात जन्मतः तीन वॉल ब्लॉक आहेत. या गंभीर आजारावर मात करण्यासाठी तिच्यावर तात्काळ ह्रदय शस्त्रक्रिया होणं आवश्यक आहे. परंतू आरजूच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. तिचे वडील मुलीला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. आरजूच्या आजाराचं निदान लागताच तिच्या वडिलांनी तिला मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोर्टिस रुग्णालयात मुलीला दाखल केल्यानंतर तिच्या उपचारासाठी दोन लाखांपेक्षा जास्त पैसे लागतील हे कळताच त्यांच्या पाया खालची जमीन हलली. त्यानंतर त्यांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांकडे मदतीची मागणी केली. परंतु त्यांच्या कठीण प्रसंगी नातेवाईकांनी त्यांची साथ दिली नाही. अखेर सोशल मीडिया हे माध्यम अत्यंत प्रभावी माध्यम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. 
 
आरजूच्या वडिलांच्या हाकेला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे धावून आले आहेत. जेव्हा आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावर ही पोस्ट वाचली तेव्हा त्यांनी तात्काळ याची दखल घेत आरजूच्या  शस्त्रक्रियेसाठी मदत केली. आदित्य ठाकरेंच्या मदतीनंतर आता आरजूवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे आरजूच्या आई-वडिलांनी आदित्य ठाकरेंचे आभार मानले आहेत.