गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : मुंबईत नामांकित कंपन्यांच्या दुधामध्ये भेसळ करणाऱ्या टोळीस पोलिसांना अटक आले. गुन्हे शाखांचा गुन्हे 12 च्या वतीने या आरोपींना अटक केली आहे. मुंबईतील गोरेगाव आणि बांगुरनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही इसम नामांकित कंपन्यांचा दुधाचा पिशवीत दूषित पाणी मिळसळून ते दूध ग्राहकांना विकत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर या आरोपीच्या शोधण्यासाठी अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट १२च्या वतीने दोन पथके तयार करण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुन्हे शाखेच्या टीम, अन्न आणि औषध प्रशासन बृहन्मुंबई महाराष्ट्र शासन येथील अन्नसुरक्षा अधिकारी यांच्या समावेश करून गोरेगाव पश्चिम भगतसिंग नगर, लिंक रोड येथे छापा टाकून, दोन व्यतींना भेसळयुक्त दूध सोबत अटक करण्यात आली. 



त्याप्रमाणे दुसऱ्या पथकाने हनुमान नगर परिसरात छापा टाकून दोन व्यक्तींना अटक करण्यात आले. त्यांच्याकडून १३९ लिटर भेसळयुक्त दूध ताब्यात घेतले. तसेच दूध भेसळ करण्याकरिता लागणारे साहित्य अमोल कंपन्यांच्या बनावट पिशव्या, प्लास्टिकच्या पिशव्या हस्तगत करण्यात आल्या.


दोन्ही पथकांनी ताब्यात घेतलेले तीन पुरुष आणि एक महिला हे नामांकित अमोल गोल्ड, अमोल ताजा दूध कंपन्यांच्या मूळ पिशव्या कात्रीने कापून त्या पिशव्या मधील दूध काही प्रमाणात बाहेर काढून त्यामध्ये मानवी जीवनास हानिकारक असे दूषित पाणी मिसळले जायचे. त्या दुधाच्या पिशव्या स्टोव्ह पिन आणि मेणबत्तीच्या सहाय्याने पुन्हा सिल करून नामांकित कंपन्यांचे प्रमाणित दूध आहे असे भासवून ग्राहकांची फसवणूक करून बेकायदेशीर लाभ मिळविण्याच्या तयारीत होते.


त्यामुळे सकाळी तुमच्या घरी देखील दुधाची पिशवी येत असाल तर जरा सावधान ! तुमच्या घरी येत असलेले दूध भेसळयुक्त तर नाही ना ? याची तपासणी करा.