मुंबई - अलिबागजवळ समुद्रात प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली आहे. मुंबईहून मांडवा येथे प्रवासी घेऊन निघालेल्या या बोटीचा अपघात झाला आहे. खडकावर आदळून बोट कलंडली आहे. या बोटीत 88 प्रवाशी होते. या सर्व 88 प्रवाशाना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. पोलिसांच्या बोटीने या प्रवाशांना बाहेर काढले आहे. प्रवाशी सुखरूप बाहेर आले असून सुदैवाने अनर्थ टळला आहे. जेट्टीजवळ पोहोचत असताना अचानक ही बोट एका बाजूला कलंडली. बोट बुडत असल्याचे लक्षात येताच तिथे असलेली पोलिसांची पेट्रोलिंग बोट मदतीला धावून गेली. पोलिसांच्या पेट्रोलिंग बोटीवरुन ८८ प्रवाशांना सुखरुप जेट्टीवर पोहोचवण्यात आले. अन्य आठ जणांना स्पी़ड बोटीच्या मदतीने किनाऱ्यावर पोहोचवण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान रो रो सेवा लवकरच सुरु होणार आहे. या बोटीच्या चाचण्या सुरु झाल्या आहेत. या दरम्यान देखील एक अपघात झाला होता. बुधवारी मांडवा येथे बोटीची पहिली चाचणी पार पडली. चाचणी दरम्यान मांडवा टर्मिनलवर बोट धडकली. 



पहिली चाचणी व्यवस्थित पार पडली. पण दुसऱ्या चाचणी दरम्यान ही बोट मांडवा टर्मिनलवर धडकली.  अपघात किरकोळ स्वरूपाचा होता. मग मात्र कप्तानाने बोट मागे घेऊ न व्यवस्थित थांबविली. यानंतर आतील बोटीतील गाडय़ा सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्या.



भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान रोरो जलवाहतूक सेवेला रविवारपासून (१५ मार्च) सुरूवात होणार आहे. या पाश्र्वभूमीवर बोटीच्या चाचण्यांना सुरूवात झाली आहे.