Escobar Pub Fight Video : मुंबई शहर हे नाईट लाइफ आणि नाईट पबसाठी खूप प्रसिद्ध आहे. विकेंडला तरुणांमध्ये पबची खूप क्रेझ आहे. मुंबईतील वांद्रे भागातील एका पबचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ एस्कोबार पबचा असून तिथे बाऊन्सर आणि कर्मचाऱ्यांची दादागिरी दिसून येते आहे. एका ग्राहकाला लिफ्टमध्ये घुसून बाऊन्सर मारहाण करताना दिसतं आहे. या प्रकरणात पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. 


धक्कादायक घटना 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कर्मचारी ग्राहकांना रॉडने मारताना दिसत आहेत. तर काही कर्मचारी लाथाबुक्याने मारत आहेत. (mumbai bandra Escobar pub Bouncer coustmer fight video get viral on Internet Trending videos today )


दुसऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ग्राहक लिफ्टमधून जात असताना त्याला धरुन धरुन बाऊन्सर आणि कर्मचारी मारताना दिसत आहेत. ही घटना शनिवारी रात्री एकच्या सुमारस घडली आहे. या घटनेत एक तरुण ग्राहक जखमी झाला आहे. 


मारहाणी मागे कारण की...


या मारहाणीमागे कारण असं झालं की, त्या क्लबमध्ये 23 जणांच्या गटाने एक टेबल बुक केलं होतं. पार्टी सुरु झाली त्या टेबलच्या शेजारी 10 जणांचा ग्रुपही बसला होता. त्यातील एका ग्रुपमधील टेबलवर शॅम्पेन उघडण्यात आली. त्यावेळी त्याचा शिडकावा दुसऱ्या ग्रुपवर पडला. या कारणावरुन या दोन ग्रुपमध्ये वादावादी झालीय.


अखेर शाब्दिक वादावादी थांबविण्यासाठी क्लबचा बाऊन्सर मध्ये घुसरला. या दोन ग्रुपमधील भांडण बाजूला राहिले आणि बाऊन्सर ग्राहकांमध्ये भांडण सुरु झाले. प्रथमदर्शनीने पोलिसांना असं सांगितलं की, या भांडण्यात एका बाऊन्सरने लोखंडी रॉड काढला आणि मारहाण करायला लागला. अगदी त्या ग्राहकाला लिफ्टमध्ये जाऊन बाऊन्सरने त्याचे कपडेदेखील फाडले. 


व्हिडीओमध्ये मारहाण करणाऱ्या बाऊन्सरसह व्यवस्थापकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात भादंवि कलम 143, 147, 148 आणि 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर Mohsin shaikh या व्यक्ती हा व्हिडीओ शेअर केला आहे.  ही पहिली घटना नसून काही दिवसांपूर्वी मुंबईतील विक्रोळीमधील ऑरेंज मिंट रेस्टॉरंटमध्येही अशीच एक घटना घडली होती. या घटनेत कर्मचाऱ्याने तरुणांच्या एका गटाला बेदम मारहाण केली होती. त्यापूर्वी नोएडामधील स्पेक्ट्रम मॉल, सेक्टर 75 मध्येही अशीच मारहाणची घटना घडली आहे.  बिलातील सेवा शुल्कावरून ग्राहक आणि रेस्टॉरंट कर्मचारी वादावादी झाली होती.