मुंबै बँकेच्या अनधिकृत बांधकामावर अखेर हातोडा पडला
मुंबै बँकेच्या अनधिकृत बांधकामावर अखेर हातोडा पडला आहे. २५ लाख रूपये खर्चून कायदा धाब्यावर बसवत हेरिटेज मुंबै बँकेच्या इमारतीच्या गच्चीवर बेकायदेशीरपणे कॉन्फरन्स रुम बांधण्यात आली होती.
मुंबई : मुंबै बँकेच्या अनधिकृत बांधकामावर अखेर हातोडा पडला आहे. २५ लाख रूपये खर्चून कायदा धाब्यावर बसवत हेरिटेज मुंबै बँकेच्या इमारतीच्या गच्चीवर बेकायदेशीरपणे कॉन्फरन्स रुम बांधण्यात आली होती.
अनधिकृत बांधकामावर हातोडा
दक्षिण मुंबईतल्या फोर्ट इथल्या बँक मुख्यालयात अनधिकृतरीत्या ३० फूट बाय १५ फूटची ही कॉन्फरन्स रूम बांधण्यात आली होती. मुंबई महानगरपालिकेनं नोटीस पाठवल्यानंतर मुंबै बँकेनं हे अनधिकृत बांधकाम गुपचूप तोडून टाकलं. त्यामुळे सत्तेच्या जोरावर बांधल्या गेलेल्या हे अनधिकृत बांधकाम अखेर जमीनदोस्त झालं.
सरकार पाठीशी घालतय
झी २४ तासनं मुंबै बँकेतले अनेक गैरव्यवहार वारंवार समोर आणले होते. मात्र या गैरव्यवहारांची सरकारकडून कुठलीच चौकशी होताना दिसलेलं नाही. बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर भाजपचे आमदार असल्यानं त्यांना पाठिशी घालण्याचे काम सरकार करत असल्याचे आरोप यामुळे होत आहेत.