मुंबई : BEST air-conditioned double-decker electric bus : मुंबईकरांच्या सेवत आता बेस्टची वातानुकूलित डबल डेकर इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहे. बेस्टच्या ताफ्यात 900 बसेस 12 वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर समाविष्ट केल्या जातील. या वर्षाच्या अखेरीस या बसेसची पहिली तुकडी येण्यास सुरुवात होईल. पर्यावरणाला पूरक अशा या बस असणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने या बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.(Mumbai BEST to get air-conditioned double-decker electric buses)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील रस्त्यांवर डबर डेकर बस धावत आहेत. मात्र,  शहरातील रस्त्यांवर  इलेक्ट्रिक डबल डेकर  बस प्रथच धावणार आहे. त्या वातानुकूलित ई-बस असतील. सध्या फक्त 48 डबल डेकर वाहने आहेत, जी आधीच्या 120 पेक्षा कमी आहेत. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) समितीने मंगळवारी 900 वातानुकूलित डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्त्वावर समाविष्ट करण्यास मान्यता दिली. त्यामुळे आता मुंबईत इलेक्ट्रिक डबल डेकर  बस धावताना दिसणार आहे.


25 जानेवारी रोजी, बेस्ट समितीने 900 एसी डबल डेकर ई-बस कराराने भाडेतत्त्वावर घेण्यास मान्यता दिली होती. त्याआधी 200 खरेदी करण्याच्या योजनेनंतर इलेक्ट्रिक डबल डेकर बस  भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. या वर्षाच्या अखेरीस या बसेसची पहिली तुकडी येण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे, असे एका बेस्टच्या अधिकाऱ्याने सांगितले.


मार्च 2023 पर्यंत, बेस्टने 50 टक्के इलेक्ट्रिक फ्लीटचा प्रस्ताव ठेवला आहे आणि मार्च 2027 पर्यंत पूर्ण ई-फ्लीट असण्याची आशा आहे. 1,400 सिंगल-डेकर एसी ई-बस, 400 मिडी एसी ई-बस आणि 100 मिनी एसी ई-बस आहेत. दरम्यान, मात्र, या 900 डबल डेकरचा प्रस्ताव मंजूर होण्यापूर्वीच शिवसेना आणि भाजपमध्ये ठिणगी पडलेली दिसून येत आहे. पहिली गोष्ट म्हणजे बेस्ट उपक्रमाने सुरुवातीला अवजड उद्योग मंत्रालयाकडून 200 एसी ई-डबल डेकर बस खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, ज्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या.