मुंबई : बेस्टचा प्रस्तावित संप टळला आहे. बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने संप मागे घेतल्याचे जाहीर केले आहे. मागण्या मान्य करण्यासाठी बेस्ट प्रशासनाला वेळ दिला आहे. आपल्या विविध मागण्यासाठी बेस्ट कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार होते. संप करायचा की नाही, यावर मदतान घेण्यात आले. संपाच्या बाजुने मतदान झाले तरी संप मागे घेण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने संप मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. मागण्या मान्य करण्यासाठी बेस्ट प्रशासनाला वेळ दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र २६ ऑगस्टपासून कृती समितीचे सदस्य वडाळा डेपोबाहेर धरणे आंदोलन करणार आहेत. 


विशेष म्हणजे ९८ टक्के कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने कौल दिला होता. बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती संप करणार नाही. वेतन करार सुधारणा, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणे आणि पालिका कर्मचाऱ्यांइतका बोनस देण्याच्या प्रश्नावर लवकर तोडगा काढण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.