BMC Covid Period Expenditure: कोरोना काळात मुंबई महापालिकेने केलेल्या खर्चाचा हिशोब मिळत नसल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली होती. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिका आयुक्त कार्यालयात अर्ज करत कोविड काळात करण्यात आलेल्या 4 हजार कोटींचा खर्चाबाबत सादर अहवालाची प्रत मागितली होती. मुंबईतील एका कार्यक्रमात पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल कोविड काळात 4 हजार कोटींचा खर्च करण्यात आल्याचा दावा केला होता पण कोविड काळातील 4 हजार कोटींचा खर्चाचा तपशील पालिकेकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान मुंबई पालिकेने याचा तपशील जाहीर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिकेने कोरोना कोव्हीड सेंटरसाठी 1466 कोटी रुपये कोरोना काळात खर्च केले आहेत.  तर मुंबईतील 24 वार्ड मध्ये कोरोना काळात विविध आरोग्य सोयी सुविधांसाठी 1245 कोटी रुपये मुंबई महापालिकेने खर्च केले असल्याची माहिती देण्यात आली.


मुंबई पालिकेकडून नायर, कूपरसह  इतर महत्त्वाच्या रुग्णालयांमध्येसुद्धा कोरोना काळात अनुक्रमे महत्त्वाच्या रुग्णालयांसाठी 197.07 कोटी आणि स्पेशलाईज रुग्णालयांसाठी 25.23 कोटी, मल्टी स्पेशलिटी रुग्णालयांसाठी 89.70 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती देण्यात आली आहे.


यासोबतच फूड पॅकेट्स, ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट सॉलिड वेस्ट डिपार्टमेंट, डायग्नोस्टिक मेडिकल सेंटर व इतर सोयी सुविधांसाठी 233.10 कोटी रुपये खर्च केल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबई महापालिका कोरोना काळात झालेला खर्च लपवत असल्याचं सांगण्यात येत असताना मुंबई महापालिका प्रशासनाकडून संपूर्ण चार हजार कोटींपेक्षा अधिकचा खर्च देण्यात आला आहे. 


एकीकडे कोविड काळात भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याचा आरोप होत असून केंद्रीय पथक आणि मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशी करत आहे तर दुसरीकडे स्वतः पालिका आयुक्त 4 हजार कोटींचा हिशोब देत नाही, ही बाब गंभीर असल्याचे सांगत अनिल गलगली यांनी कोविड काळातील खर्चाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे.