Elephanta Caves Boat Accident : पहिल्या 30 मिनिटात `तो` ठरला देवदूत, 3 वर्षांच्या चिमुकलीसह 25 जणांना वाचवलं
Elephanta Caves Boat Accident : मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथे बोट अपघातनंतर पहिल्या 30 मिनिटात मोहम्मद आरिफ बामणे हा 25 जणांसाठी देवदूत ठरला. 3 वर्षांच्या मुलीला रेस्क्यू केल्यानंतर ती श्वास घेत नव्हते, तेव्हा आरिफने....
Elephanta Caves Boat Accident : बुधवार (18 डिसेंबर 2024) दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथल्या समुद्रात एक प्रवासी बोट उलटल्याने 13 जणांचा मृत्यू झाला. एका स्पीडबोटने प्रवासी बोटीला टक्कर दिल्यामुळे ती उलटली आणि त्यातील प्रवाशी समुद्रात बुडाले. गेटवे ऑफ इंडियाहून ही बोट एलिफंटाला जात असताना दुर्घटना घडली. या बोटीवर मुंबईसह पर्यटकही होते. नीलकमल नावाची बोट 120 प्रवाशांना घेऊन एलिफंटाकडे निघाली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अपघात झाल्यानंतर पहिल्या 30 मिनिटात दुसऱ्या बोटीवर असलेल्या मोहम्मद आरीफ त्या 25 जणांसाठी देवदूत ठरला.
पहिल्या 30 मिनिटात 'तो' ठरला देवदूत
बोटी बुडल्याच कळताच पूर्वा बोटावरील आरिफ बामणे पुढच्या क्षणी लोकांना रेस्क्यू करण्यासाठी पोहोचले. मदत कार्य येण्यापूर्वीच आरिफ बामणेने जवळपास 25 जणांची सुखरुप सुटका केली. ज्यावेळी आरिफ दुर्घटनाग्रस्त बोटीजवळ पोहोचले ते दृष्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. लोकांचा आक्रोश आणि वाचवा वाचवा अशी हाक...सगळं निशब्द करणारे दृश्य होतं.
पण क्षणाचाही विलंब न करता त्यांनी लोकांना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले. ज्या लोकांजवळ लाइफ जॅकेट नव्हते त्यांना ते देऊन त्यांना बोटीवर सुखरुप घेण्यात आले. आरिफ यांनी सांगितलं की, अपघात इतक्या भयानक होता की, 5 ते 10 मिनिटातच बोट बुडाली. त्याक्षणी बोटीवरील काही लोकांना लाइफ जॅकेट मिळवण्यात यश आलं पण काही लोक अपयशी ठरले.
या रेस्क्यू ऑपरेशनच्या वेळी आरिफ यांनी एका साडेतीन वर्षांच्या मुलीला जीवदान दिलं. ज्यावेळी तिला वाचविण्यात आलं तेव्हा ती श्वास घेत नव्हती. त्यांनी लगेचच तिला पोटावर झोपवून तिच्या पोटातील पाणी बाहेर काढलं छाती दाबून. त्यामुळे तिचं श्वास परत सुरु झाला अन् तिच्या आईने या देवदूताचे आभार मानले.
आरिफ यांची बोट ही एक पायलट बोट होती. पायलट बोट म्हणजे समुद्रातील मोठ्या बोटींना समुद्र किनाऱ्यावर आणण्यासाठी त्यांना दिशा देण्याच काम करतं.