आताची मोठी बातमी! मुंबईकरांसाठी `कडू` बातमी, पालिकेच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर
मुंबई महानगरपालिका 2 फेब्रुवारीला आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे, पण त्याआधीच मु्ंबईकरांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई : मुंबईची (Mumbai) ओळख ही 24 तास धावणारं शहर अशी आहे. घड्याळ्याचा काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांची जीवशैलीही धावपळीची आहे. या बदलत्या जीवनशैलीमुळे मुंबईकरांमधअेय रक्तदाब, मधुमेहाचा धोकाही वाढला आहे. (blood pressure and diabetes is increasing) मुंबई अर्थसंकल्पाच्याआधी (Mumbai Budget 2023) पालिकेच्या अहवालात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील तब्बल 27 टक्के नागरिक मधुमेहाच्या (Diabetes) आजाराने त्रस्त आहे. त्यामुळे मुंबईतून मधुमेह हा आजार कसा कमी करायचा सरकारकडून भर दिला जाणार आहे.
यंदाच्या पालिका अर्थसंकल्पात मुंबईकरांच्या आरोग्य विषयक यंत्रणेत वाढ करण्यासंदर्भात भर देणार असल्याची माहिती आहे. मुंबई पालिकेतर्फे घरोघरी जाऊन माहिती घेतली जाणार आहे. यासाठी एक विशेष पथक नेमलं जाणार आहे. हे पथक घरोघरी जाऊन मधुमेह रुग्णांची माहिती घेणार आहे. तर प्रदूषण मुक्त मुंबईसाठीदेखील पावलं उचलली जाणार आहेत.
मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ
आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या अहवालानुसार 2019 पर्यंत देशात मधुमेहाचे सुमारे 7.7 कोटी रुग्ण होते. 2030 पर्यंत ही संख्या 10 कोटी होऊ शकते. 20-79 वयोगटातील मधुमेहग्रस्तांच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात 7.2 कोटी लोकं मधुमेहग्रस्त आहेत. यापैकी 3.6 कोटी लोकांना मधुमेहाची लागण झाली आहे याची कल्पनाच नाही. 90.95 टक्के लोकं ही टाईप-2 चे रुग्ण आहेत.
मधुमेहाची लक्षण काय आहेत? (Symptoms of Diabetes)
लक्षण 1 – मधुमेहग्रस्त रुग्णांना जास्तीत जास्त पाणी प्यावसे वाटतं. वारंवार लगवीला लागने. जास्त पाणी पिऊनही वारंवार तहान लागणे. अशा वेळी तहान भागविण्यासाठी काही लोक ज्यूस, सोडा, चॉकलेट, दूध आदी गोष्टींचे सेवन करतात. पण, या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरातील साखर अधिकच वाढते.
लक्षण 2 – वजन घटने – वजन अधिक मोठ्या प्रमाणात वाढणे मधुमेहाला निमंत्रण देतं. तसंच, प्रमाणापेक्षा कमी होणं हे सुध्दा मधुमेहाचंच लक्षण आहे. वजन घटण्याची डॉक्टर दोन कारणे सांगतात. एक वारंवार वॉशरूमला जाणे आणि दुसरे म्हणजे शरीरातील वाढत्या कॅलरीजवर नियंत्रण ठेवता न येणे.
लक्षण 3 – काम केल्यावर थकवा जाणवने ही अत्यंत साधी बाब आहे. मात्र, नियमितपणे अशक्तपणा जानवणे हा मधुमेहाचे लक्षण दाखवणारा प्रकार आहे. हे लक्षण दिसतात त्वरीत डॉक्टरांशी संपर्क करा. टाईप-2 मधुमेहात रूग्णाच्या शरीरातील साखर काही काळासाठी मोठ्या प्रमाणात वाढते. या प्रकाराची लक्षणे हळुहळू पूढे येतात.