मुंबई :  मुंबईतल्या भाऊचा धक्का परिसरात असलेल्या बुचर आयलँडला शुक्रवारी संध्याकाळी ४.३० वाजता आग लागली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुमसणार्‍या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेले दोन दिवस जावान झटत आहेत. या भीषण आगीमुळे तेलाच्या टाक्या समुद्राच्या दिशेने झुकल्या आहेत. मात्र अखेर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
 टाक्यांवर आग पसरु नये यासाठी सुरक्षिततेचे उपाय करण्यात येत आहेत. खबरदारी म्हणून फोम कुलिंगही सुरु आहे. ही पूर्णपणे आग विझवण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे. 
 
 सुरक्षेच्या कारणास्तव इथे डिझेल आणि पेट्रोल घेऊन जाणा-या सर्व जहाजांना हलवण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बीपीटीसह मुंबई अग्निशमन दलाचे जवान शुक्रवारपासून झटत आहेत. ही आग पूर्णपणे विझली नसली तरी नियंत्रणात असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आली आहे. या आगीत  सुमारे 235 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.  


कशी लागली ही आग ? 


शुक्रवारी सायंकाळी मोठा पाऊस झाला आणि त्याचवेळी बुचर आयलँडजवळ वीज कोसळली. त्यामुळे स्पार्किंग होऊन डिझेल टँकला आग लागली होती. काही वेळातच ही आग भडकली. ही आग अजुनही धुमसत आहे.