२४ तासानंतरही बुचर आयलँडवरची आग काही विझेना
मुंबईजवळील बुचर आयलँडवरील आग अजूनही भडकलेलीच आहे. तेलाचा साठा संपेपर्यंत ही आग विझणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई : मुंबईजवळील बुचर आयलँडवरील आग अजूनही भडकलेलीच आहे. तेलाचा साठा संपेपर्यंत ही आग विझणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इथल्या पेट्रोकेमिकल्सच्या साठ्याला शुक्रवारी ही आग लागलीय. मुंबई शुक्रवारी दुपारच्या वेळी अचानक आलेल्या वादळी स्थिती मुंबई वीजा कडाडत होत्या. याच दरम्यान वीज पडून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
बेटावरील क्रमांक १३ आणि १४ या टाक्यांमध्ये ही आग लागली. बीपीटी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान, या भागातून होणा-या जलवाहतुकीला अजिबात धोका नसल्याचा निर्वाळा देण्यात आलाय.