Mumbai Central Local Line : मध्य रेल्वेचे मोटरमन मुरलीधर शर्मा यांचा भायखळा व सँडहर्स्ट रोड दरम्यान रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची (Mumbai local motorman) धक्कादायक माहिती काल समोर आली होती. लोकल अपघातात मृत्यू झालेल्या मोटरमनच्या अंत्यविधीला जाण्यासाठी अन्य मोटरमनने अतिरिक्त काम करण्यास नकार दिल्याने आता मध्य रेल्वे आणि हार्बल रेल्वेची सेवा विस्खळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. तर आतापर्यंत 84 लोकल रद्द झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृत झालेल्या मोटरमनच्या अंत्यविधीला अन्य मोटरमन आणि रेल्वे कर्मचारी गेल्याने मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवरील लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी रेल्वे सिग्नल धोकादायक पद्धतीने ओलांडल्यामुळे त्यांची रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू होती. हे प्रकरण सुरू असताना सॅंडहर्स्ट रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मोटरमनने संताप व्यक्त करत अंत्यविधीला जाण्यासाठी निर्णय घेतला.


Mumbai Local : मध्य रेल्वेवर 'पॉवर ब्लॉक', कसं असेल लोकलचं वेळापत्रक?


ओव्हरटाइमला नकार


मोटरमनच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी या मोटरमननी आपण आता सिंगल ड्युटी करणार असून डबल ड्युटी करणार नाही असा पवित्रा घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मोटरमनच्या विश्राम विश्रामगृहासमोर युनियननी टाईम असा बोर्ड लावण्यात आला आहे. त्यांनी आता अतिरिक्त काम न करण्याचा निर्णय घेतल्याने मुंबईकरांचे हाल झाल्याचं पहायला मिळतंय.


रेल्वेची अधिकृत घोषणा


काल एका मोटरमनच्या दुर्दैवी मृत्यूमुळे नियोजित अंतिम संस्कार आणि अंत्यसंस्कार आज दुपारी 12:00 वाजता नियोजित होते. परंतु जवळचे कुटुंबीय पोहोचल्यावर 17:00 वाजता अंत्यसंस्कार झाले. अंत्यसंस्काराला मोठ्या संख्येने मोटरमन उपस्थित असल्याने ते ट्रेनच्या कामकाजासाठी अनुपलब्ध होते. त्यामुळे दिवसभरात 88 लोकल ट्रेनसह सुमारे 147 गाड्या रद्द करण्यात आल्या, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.