मध्य रेल्वेवर विद्यार्थ्यांचा रेल रोको, प्रवाशांचे हाल (फोटोगॅलरी)
दादर-माटुंगा रेल्वे मार्गादरम्यान रेल्वे परिक्षणार्थींनी आंदोलन करत लोकल रेल्वे रोखून धरली आहे.
मुंबई : दादर-माटुंगा रेल्वे मार्गादरम्यान रेल्वे परिक्षणार्थींनी आंदोलन करत लोकल रेल्वे रोखून धरली आहे.
सकाळी सात वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या मागण्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही.
आंदोलक तरुणांना एप्रेन्टिसशिप केली आहे. सर्व तरुणांना रेल्वेकडून कामात सामील करून घ्यावं, अशी त्यांची मागणी आहे.
प्रशिक्षणार्थींसाठी सरकारनं २० टक्के कोटा लागू केलाय... परंतु, आम्हाला वन टाईम सेटलमेंट मिळायला हवं, अशी मागणी करत हे प्रशिक्षणार्थी आंदोलनात सहभागी झालेत.
रेल्वे प्रशासनाला आंदोलनाची अनेकदा पूर्वसूचना देण्यात आली होती, असंही या आंदोलकांचं म्हणणं आहे.
महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतातून आलेले रेल्वे अप्रेन्टिस करणारे हे तरुण इथं आंदोलनात सहभागी झालेत.
या आंदोलनाची माहिती देताना 'कुठल्या तरी आंदोलनामुळे रेल्वेचा खोळंबा झाल्याचं' मध्य रेल्वेनं सोशल मीडियावर म्हटलंय.
दादर- मांटुगादरम्यान विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली. रेल्वे परीक्षा गोंधळाविरोधात विद्यार्थी रेल्वे रुळावर उतरले.